छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळां मध्ये समाविष्ट

Loading

छत्रपती शिवरायांना शिवतीर्थ येथे शिवप्रेमींची मानवंदना ; पेढे-साखर वाटून आनंद उत्सव

जयसिंगपूर / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये सहभाग झाला. हा सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी शिवतीर्थ येथे शिवप्रेमिनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांना मानवंदना तसेच जिजाऊ वंदना म्हणून पेढे-साखर वाटून आनंदत्सव साजरा करण्यात आला. जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणानी शिवतीर्थ परिसर दुमदूमला.

यावेळी शिवप्रेमी शंकर नाळे, सतीश मलमे, स्वप्निल जगताप, सचिन डोंगरे, स्वप्निल सावंत, सुरज भोसले, अविनाश शिंगाडे, अभिजित मोरे, रोहन मोरे, धीरज सावंत, जयदीप रजिगिरे, प्रणव पवार, रुद्र रजिगिरे, सारंग काळुगडे, राहुल शिंगाडे, रमेश दंगेकर, उदय पवार, तानाजी सावंत यांचेसह शिवप्रेमी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *