![]()
आजरा : हसन तकीलदार
डोक्याला गंभीर आणि मोठी जखम झालेल्या कुत्र्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. गंभीर आणि जखमी अशा या कुत्र्याच्या उपद्रवांमुळे आजरा शहर त्रस्त झाले आहे.
या कुत्र्याच्या डोक्यावर एवढी खोलवर आणि गंभीर जखम झाली आहे कि हे दृश्य किळसवाणे आहे. किडे पडलेल्या अवस्थेतील जखम घेऊन हा कुत्रा बिनदिक्कतपणे कोणाच्याही घरात घुसत आहे. त्यामुळे महिला आणि मुलांना हे दृश्य पाहून कमालीचा त्रास होत आहे. या कुत्र्याचा नगरपंचायतीने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दर्गागल्ली, नाईक गल्ली, एस. टी. स्टॅन्ड, आंबोली रोड, कुंभार गल्ली, जिजामाता कॉलनी, हैदरनगर येथील घरांमध्ये हा कुत्रा घुसल्याने घरात दुर्गंधी पसरत आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे या कुत्र्याला काठीने हाकलण्याचा प्रयत्न जरी केला तर तो लवकर तेथून जात नाही. भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी हैराण असलेल्या आजारावासीयांना आता या जखमी अवस्थेत असलेल्या कुत्र्याचा सामना करावा लागत आहे. कोणतेही अनर्थ होण्याअगोदर या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कर्यकर्ते आणि युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नौशादभाई बुडडेखान यांनी केली.

