मुख्य रस्ता डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम चे दुर्लक्ष : गांधारीच्या भूमिकेत खाते

Loading

चंदगड : तातोबा गावडा –

चंदगड हे महाराष्ट्राचे टोक असून व तालुक्याचे ठिकाण असून चंदगड मध्ये प्रशासन ऑफिसला जाणारा रोड तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन, न्यायालय,एसटी डेपो,पंचायत समिती,तलाठी ऑफिस,सर्कल ऑफिस या शाळे ला जाणाऱ्या रोडला भरपूर प्रमाणात दोन दोन फुटाचे खड्डे पडलेले असून आज सार्वजनिक बांधकाम त्यांचं दुर्लक्ष आहे. या मुख्य रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खाते हे गांधारीच्या भूमिकेत असल्याची खंत जनता व्यक्त करीत आहे. दोन दिवसात उपाययोजना करा अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.

सार्वजनिक बांधकाम हे डोळे बंद करून खुर्चीवर बसले असून सार्वजनिक बांधकाम चे डोळे उघडावे आणि दोन दिवसात भरपूर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तातडीने भरून घ्यावे. जर दोन दिवसात खड्डे भरले नाही तर संभाजी चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनतेने दिला.

यावेळी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर नविद अत्तार अल्ताफ सय्यद नागेश प्रधान जुबेर आगा सलीम सय्यद समीर मदार तजमुद्दीन फनी बंद किरण येरूळकर समीउल्ला मुल्ला उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *