वाढत्या व्यसनाधीनता बद्दल महाविद्यालयीन युवकांशी संवाद

वाढत्या व्यसनाधीनता बद्दल महाविद्यालयीन युवकांशी संवाद

Loading

अंमली पदार्थ विरोधी दिन आजरा महाविद्यालयात साजरा

आजरा : प्रतिनिधी –

26 जून हा दरवर्षी अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघांनी 1987 मध्ये या विरोधात ठराव पारित केला होता. अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत डॉ. युनूस सैय्यद यांनी आजरा महाविद्यालयाच्या युवकांशी संवाद साधून तरुणांमधील वाढत्या व्यसनाधिनते बद्दल चिंता व्यक्त केली. आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित राष्ट्रीय कीटकजन्य रोग व जलजन्य रोग उपाय नियंत्रण तसेच अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संवाद साधत डॉ. सैय्यद म्हणाले कि, सद्यस्थितीत आपल्या देशामध्ये तरुण पिढी गांजा, चरस, तंबाखू अशा अंमली पदार्थांना बळी पडत आहे. गुजरातच्या अहमदाबाद बंदरावर 25 हजार कोटीची अंमली पदार्थ पकडले गेले. काही दिवसासाठी बातमी आली आणि ती लुप्त झाली. याचा अर्थच असा होतो कि देशातील युवा पिढीला देशोधडीला लावण्यासाठी काही यंत्रणा कार्यरत आहेत.

केवळ कुतूहलापोटी व्यसनांची सुरवात होते, आणि पुढे जाऊन ती दीर्घकालीन सवय लागून संपूर्ण कुटुंब उध्वस्त करीत आयुष्याची राखरांगोळी करते. अशा परिस्थितीत तरुण पिढीने तंबाखू, गुटखा, दारू, अंमली पदार्थ सिगारेट अशा व्यसनापासून दूर राहून इतरांना सुद्धा त्यापासून परावृत्त करावे असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत वातावरणातील होणाऱ्या अचानक बदलामुळे कीटकजन्य व जलजन्य आजारांची साथ पसरत आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व योजना बद्दल मार्गदर्शन केले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच एन. एस. एस. प्रमुख यांच्या बहुमोल सहकार्याने संपन्न झाला.

1 Comment

  1. M A SAYYAD

    Nice coverage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *