![]()
चंदगड / प्रतिनिधी
फाटकवाडी (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प १७ ता. पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यावरून पाणी वाहू लागले. कोकण घाटमाथ्यावरील हा प्रकल्प दरवर्षी सर्वात आधी भरतो. धरण कार्यक्षेत्रात गेले तीन-चार दिवस चांगला पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरण्यास मदत झाली.

धरण क्षेत्रात एक जूनपासून आतापर्यंत ६४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासांत १०२ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, गेले महिनाभर झालेल्या पावसाने संचय पातळी वाढली होती. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली. सध्या पाण्याची पातळी ७४२.३५ मीटर असून एकूण पाणीसाठा ४४.१७२ दशलक्ष घनमीटर आहे.
प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे विद्युतगृह विसर्ग सुरू केला आहे. ४०० क्युसेक्सने विद्युतगृहासाठी तर सांडव्यातून ३०० क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे.