![]()
जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी व खिद्रापूर येथे दोन नव्या नौकेचे पूजन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडले. नदीच्या काठावर राहणाऱ्या गावांसाठी या नौका अत्यंत आवश्यक ठरणार असून भविष्यातील पुरस्थितीत ग्रामस्थांसाठी एक जीवनरक्षक साधन म्हणून ही नौका उपयोगी पडणार आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी केले.
गणेशवाडी व खिद्रापूरला नव्या दोन नौका मिळाव्यात यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हा परिषदेकडे शिफारस केली होती. या शिफारशीनुसार या गावाला दोन नवीन नौका प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान नुकतेच कनवाड गावालासुद्धा एक नौका मंजूर झाली असून लवकरच या नौकेचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
प्रथम गणेशवाडी येथे पार पडलेल्या पूजन सोहळ्यावेळी सरपंच प्रशांत अपिने, उपसरपंच जयपाल खोत, गटविकास अधिकारी नारायण घोलप, उपअभियंता पंचायत समिती शिरोळचे बदडे, ग्रामविकास अधिकारी विनायक शिवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य गजानन गताडे, पोलीस पाटील संदीप अपिने, बाळासो बनकर, सलीम कोरबू, नावाडी सदाशिव आंबी, धुळाप्पा आंबी तसेच सुभाष शिरगावे, परशुराम गौराजे, बाळासो अपिने, धनपाल खोत आदी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यानंतर खिद्रापूर येथे पार पडलेल्या समारंभातही आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत नौकेचे पूजन करण्यात आले. या वेळी सरपंच सरिता कदम, उपसरपंच पूजा पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, उपअभियंता बदडे, ग्रा. पं. सदस्य राजू सुनके, इर्शाद मुजावर, सरताज घालयत, द्वारपाल लडगे, रावसाहेब रायनाडे, अण्णासाहेब कुरुंदवाडे, हैदर मोकाशी, शाहू कुलकर्णी, हिदायत मुजावर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचे आभार मानले. अनेक वर्षांपासून या भागात नौका सेवेची आवश्यकता होती. आता पुराच्या काळात व दैनंदिन प्रवासासाठी ही नौका ग्रामस्थांना मोठा आधार ठरणार आहे.
