![]()
शिरोळ / प्रतिनिधी

श्री दत्त ऊस वाहतूक संघाच्या वतीने ऊसतोड मजुरांची हित लक्षात घेऊन अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. कारखान्याच्या ऊसतोड मजूर बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व ऊस तोड मजूर अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास अवयव निकामी झाल्यास विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते. या पॉलिसी अंतर्गत सन 23 24 च्या हंगामात जखमी झालेले रमेश पांडुरंग घुंगासे, लक्ष्मण अशोक जाधव, कबीर किसन इंगळे, तारामती तेजस माळी यांना प्रत्येकी 25 हजार रुपये तसेच ट्रॅक्टरवरून पडून ट्रॉली खाली सापडून मयत झालेल्या शकील छोटू शहा यांच्या वडिलांना रुपये 3 लाखाचा धनादेश दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील (दादा) यांच्या हस्ते देण्यात आला. बैलांना दुखापत झालेल्या 19 जणांना ही यावेळेस आर्थिक मदत करण्यात आली. यावेळेस कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाना, श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे चेअरमन धनाजी पाटील नरदेकर, सचिव उदय संकपाळ,विमा प्रतिनिधी चिंतामणी कुलकर्णी व आदी मान्यवर उपस्थित होते.