गवा रेडा दुचाकीला धडकला : दुचाकीस्वार गंभीर  

गवा रेडा दुचाकीला धडकला : दुचाकीस्वार गंभीर  

Loading

चंदगड : प्रतिनिधी- 

चंदगड हेरे मार्गावर अचानकपणे दुचाकीला गवा रेडा धडकला. दुचाकी चालक या धडकेत गंभीर जखमी झाला. नंदू म्हातारू कांबळे रा. पार्ले असे जखमीचे नाव आहे. शनिवार सकाळी सात वाजता चंदगड हेरे मार्गावर मोहन तळे नजीक ही घटना घडली. वन विभागाच्या मदतीने जखमीला गडहिंग्लज येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदू कांबळे हे शनिवारी सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडले. चंदगड हेरे मार्गावर मोहन तळे नजीक ते आले असता जंगल परिसरातील झुडपातून एक गवा अचानक जोरात रस्त्यावर आडवा आला. गवा रेडा आणि दुचाकीची धडक झाली. नंदू कांबळे हे मोटरसायकल वरून खाली पडले. गवा रेडा निघून गेला. या मार्गाने वाहतूक करणारी अनेक मंडळी नंदू कांबळे यांच्या मदतीला धावली. संबंधित घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनपाल कृष्णा डेळेकर, तांबोळी यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी जखमीवर चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केले. मात्र नंदू कांबळे यांना डोकीला जखम तसेच असून शरीराला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज येथे पाठवण्यात आले. या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *