![]()
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते बुधवारी २० जणांचा गौरव
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड प्रेस क्लबचे “प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते बुधवारी शिक्षण, साहित्य, उद्योग, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २० जणांना या पुरस्काराने गौरण्यात येणार आहे. मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये हा बुधवार दि. ७ रोजी सायंकाळी ५ वाजता सोहळा होणार आहे. सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार शिवाजी पाटील भूषवित आहेत. तसेच माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी आमदार राजेश पाटील, दौलत उद्योग समूहाचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नरसू पाटील, कान्होबा माळवे, लक्ष्मण गावडे, डॉ. संजीव पाटील, वैजनाथ शिंदे, सुधीर पाटील, धनाजी पाटील, डॉ. विश्वनाथ पाटील, प्रशांत अनगुडे, सचिन मेंगाणे, प्रा. दीपक पाटील, राजश्री पचंडी, प्रकाश बोकडे, राजाराम बिरजे, बाळासाहेब बांदिवडेकर, संजय निट्टूरकर, पांडुरंग बेनके, रजत हुलजी, पांडुरंग मोहनगेकर, विठोबा जाधव यांना गौरवण्यात येणार आहे. या गौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चंदगड प्रेस क्लबने केले आहे.


