![]()
आजरा / हसन तकीलदार
आजरा तालुक्यातील वसंतराव देसाई साखर कारखान्याला सर्व प्रथम आर्थिक आरिष्ठातून बाहेर काढणे गरजेचे असून कर्ज आणि शासकीय देणी यांचे योग्य नियोजन करून त्यामध्ये सवलती मिळवण्याची गरज आहे. सहकार क्षेत्रातील आपल्या दीर्घ व कुशल अनुभव घेऊन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई आपल्या अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे सहकार मंत्री नाम. बाबासाहेब पाटील आणि साखर आयुक्त सिद्राम सलीमठ यांची पुणे येथे नुकताच भेट घेतली.
आजरा कारखाना अडचणीत असून योग्य व काटकसरीने कारखान्याचे नियोजन करून शासकीय यंत्रणेकडून जास्तीत जास्त सवलत मिळवणे ही काळाची गरज आहे. कारखान्याला सवलत मिळावी अशा आशयाचे निवेदन देऊन सहकार मंत्री आणि साखर आयुक्ताना विनंती करण्यात आली आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीरभाऊ देसाई, संचालक उदयराज पवार, अनिल फडके, रणजित देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती आदिजण उपस्थित होते.


