![]()
शहरात उत्तम काम करून प्रगतीही करावी : मानसिंग खोराटे
गडहिंग्लज / प्रतिनिधी
हालेवाडी ता. आजरा येथील सर्वोदय नागरी पतसंस्थेच्या गडहिंग्लज शाखेचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. सहाय्यक निबंधक अमित गराडे, आजरा अर्बनचे चेअरमन अशोक चराटी यांच्या प्रमूख उपस्थितीत संस्थेच्या पाचव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अथर्व दौलत चे अध्यक्ष मानसिंग खोराटे होते. कोणतीही आर्थिक संस्था ग्रामीण भागात सुरु करून ती सर्वदूर वाढवणे तशी खुप कठीण गोष्ट आहे. मात्र, चांगले सहकारी आणि योग्य नियोजन यामुळे संस्था मोठी होते. त्याचेच उदाहरण म्हणजे सर्वोदय म्हणायल हरकत नाही. त्यामुळे संस्थेने आता गडहिंग्लजसारख्या शहरात उत्तम काम करावे आणि प्रगती करावी अशा भावना यावेळी अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी मनोगत व्यक्त केले.
चेअरमन सुनिल पाटील यांनी स्वागत केले. प्रास्तावीक संचालक विलास पाटील यांनी केले.
यावेळी अशोक चराटी म्हणाले, सर्वोदय संस्था ग्रामीण भागात असली तरी उल्लेखनीय कार्य केले. त्यामुळे संस्था अनेकांची आधारवड बनल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. यावेळी सहाय्यक निबंधक ए. व्ही. गराडे, अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजरा साखर कारखाना चेअरमन मुकुंददादा देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, माजी सभापती वसंतराव धुरे, केडीसीसी संचालक सुधीर देसाई, प्रा. सुनिल शिंत्रे, बाळेश नाईक, मारूतीराव घोरपडे, नामदेव नार्वेकर, सुरेश पोवार, दिपक येसादे, संचालक रविंद्र खोसटे, महादेव आपके, अरुण पाथरवट, रमेश कांबळे, रेखाताई कटाळे, शोभा येजरे यांच्यासह सभासद, ठेवीदार उपस्थित होते. शाखाधिकारी सुनिल पन्हाळकर यांनी आभार मानले.

