![]()
कारखाना राज्यात आदर्श ठरेल : चेअरमन मानसिंग खोराटे
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व-दौलत साखर कारखाना यंदाच्या २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून २०२५-२६ च्या तोडणी वाहतुक कराराचे ऍडव्हान्स अडव्हान्स चेक वाटप कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. यंदा ७ लाख मी. टन गाळपाचे उद्धिष्ट असून अद्यावत वाहतूक यंत्रणाही सज्ज आहे. आज वाहतुकीसाठीचे धनादेश वाटप प्रसंगी कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, संचालक विजय पाटील, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, लेबर ऑफिसर अश्रू लाड, तसेच इतर मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“साखर उद्योगाला सध्या विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. तरीपण शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे पगार, तोडणी वाहतूकदारांची बिले यासारख्या गोष्टी वेळेत पूर्ण करणे ही आमची प्राथमिकता जबाबदारी राहील. व भविष्यातही सर्व बिले वेळेत देणेबाबतची ग्वाही दिली.” कारखाना कार्यक्षेत्राचा भोगोलिकदृष्टया अभ्यास करुन येणाऱ्या काळात AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न वाढीवर भर देणार आहे. त्यासाठी शेतक-यांना मेळाव्याद्वारे मार्गदर्शन व ऊस विकास योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. तसेच दौलत कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा आहे. शेतकरी, तोडणी-वाहतूक कंत्राटदार, कामगार यांचे पूर्ण सहकार्य आमच्या पाठीशी आहे. हीच आमची खरी ताकद आहे. येणाऱ्या गळीत हंगामात उच्चांकी गाळप करत कारखाना राज्यात आदर्श ठरेल, याची खात्री मी देतो. या कार्यक्रमामुळे कारखान्याच्या कार्यपद्धतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले.
चेअरमन खोराटे यांच्या कुशल मार्गदर्शन व प्रखर इच्याशक्तीच्या जोरावर येणारा हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर नियोजनबद्ध प्रयत्न सुरु असून मागील हंगाम अति पावसामुळे उत्पादनामध्ये घट आल्यामुळे अपेक्षित गाळप होऊ शकले नाही. यावर्षी कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे पिक चांगले असलेमुळे कारखाना वेळेत सुरू करून, शेतकऱ्यांकडून अधिकाधिक उसाचा पुरवठा घेण्यावर भर देवून सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. त्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करुन घेणेचे काम सुरु असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी सांगितले. कारखान्याचा व्यवस्थापकीय दृष्टिकोन, नियोजन व शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. असा विस्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार मधुकर करडे, रामा वांद्रे, सागर पाटील, संजय सुरुतकर, सचिन देसाई, राजेंद्र फाटक, कृष्णा पाटील, जोतीबा पाटील, राजराम लांडे, परशराम नाईक, संजय सुरुतकर व मोठ्या संख्यने शेतकरी हजर होते. सर्वांच्या उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला. स्वागत मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. लेबर ऑफिसर अश्रू लाड यांनी आभार मानले.


