निराधार आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी : आपुलकीची भिंत उपक्रमासाठी केले वस्त्रदान

Loading

अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजचा आनंददायी उपक्रम

जयसिंगपूर : प्रतिनिधी

डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज धरणगुत्तीच्या एन.एस.एस. युनिट अंतर्गत ‘आई वृद्धाश्रम’ निमशिरगाव येथे निराधार आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी करून सणाचा आनंद द्विगुणित केला. ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. अँड. सोनाली मगदूम यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती फराळ व धान्य वाटप करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सुंदर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांशी संवाद साधला आणि त्यांना आनंद दिला.

‘आपुलकीची भिंत ‘ जयसिंगपूर येथे वस्त्रदान ही करण्यात आले. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका कु. मानसी झाडे यांनी महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *