जयसिंगपुरात तरुणाचा निर्घृण खून : धारदार शस्त्राने अनेक वार करून अज्ञात मारेकरी पसार

जयसिंगपुरात तरुणाचा निर्घृण खून : धारदार शस्त्राने अनेक वार करून अज्ञात मारेकरी पसार

Loading

 परिसरासह भीतीचे वातावरण 

 जयसिंगपूर : प्रतिनिधी –

 शहरातील एका तरुणावर धारदार शस्त्राने अनेक वार करून निर्घृण खून करून एक अज्ञात मारेकरी पसार झाल्याची घटना आज बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरासह शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुनील किसन पाथरवट वय 31 असे मृताचे नाव आहे आणि तो जयसिंगपूरचा रहिवासी असल्याचे पोलिसातून समजले. शहरातील गल्ली क्रमांक १३ मध्ये या ३१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली. 

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्याचे समजते. या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. काही संशयितांशी चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, लवकरच आरोपीचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिक तपास करीत असून, खुनामागील पार्श्वभूमी समोर येणे बाकी आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *