![]()
जवाहर चे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार

इचलकरंजी – प्रतिनिधी
साखर कामगारांना दहा टक्के पगार वाढीचा आदेश अंमलबजावणी केल्याबद्दल जवाहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला. शासन दरबारी पाठपुरावा करून राज्यातील साखर कामगारांच्या 10 टक्के पगारवाढीचा अध्यादेश काढणेच्या महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. 1 ऑक्टोबरपासून या आदेशाची अंमलबजावणी कलाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याने केली. त्याबद्दल हा सत्कार साखर कामगार संघटनेमार्फत करण्यात आला.
राज्यातील साखर कामगारांना दहा टक्के पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या संदर्भातील अध्यादेश शासनाने जारी केला नसल्याने आदेशाची अंमलबजावणी होण्यास विलंब झाला होता. त्याचा जीआर तत्काळ काढण्यात यावा यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने अध्यादेश काढला आहे. आक्टोंबर महिन्यापासून पगारवाढीचे अंमलबजावणी सुरू झाल्याने जवाहर कारखान्यातील कामगारांना त्याचा लाभ मिळणार आहे. या यशाबद्दल तसेच जवाहर कारखान्यातील कामगारांना 20 टक्के बोनस चा निर्णय घेतल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने आमदार डॉ. राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले व कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, उपाध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी सेक्रेटरी शांतिनाथ चौगुले, महावीर कल्याणी, शंकर पाटील, अविनाश कांबळे, वृषभ ऐतवडे, सुरेश पवार, श्रीकांत करडे, बाबू दोड्डणावर यांच्यासह संचालक सुनील पाटील, महेश पाटील, केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे आदी उपस्थित होते.