शरद इंजिनिअरिंगमध्ये १३ ऑक्टोंबरला राष्ट्रीय स्तरावरील’इम्पेटस २के२५’ टेक्निकल स्पर्धा

Loading

हजारो स्पर्धकांचा सहभाग
यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सोमवार (ता.१३) ऑक्टोंबर रोजी ‘इम्पेटस २के२५’ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शरद इन्स्टिट्युट व आयआयसी, इशरे, आय.एस.टी.ई., नवी दिल्ली अंतर्गत स्टुडंट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पेपर प्रेझेन्टेशन, प्रोजेक्ट कॉम्पेटिशन, रोबो रेस यासह २५ स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रसह अडिच लाख रूपयांपेक्षा अधिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थीत आहेत.
पेपर प्रेझेन्टेशनमध्ये सर्व विभागातील विविध विषयावर शोध निबंध सादरीकरण होणार आहे. टेक्नीकल पोस्टर प्रेझेंटेशन, कोड स्नायपेट, जावा स्टॅकहॅक, कॅड मॅनिया, ग्रुप डिसक्शन, टेकक्वीझ, आयडिया नेशन, मेकएक्सप्लोअर, टेकस्पार्क, इनो बॅटल, माइंडक्राफ्ट, हॅकेथॉन, इलेक्ट्रो मॅनिया, फ्युजन मास्टर, पिक अॅण्ड प्लेस, सिव्हिल कॅन्वास, अपेक्स सर्वे चॅलेंज, वॉर ऑफ वर्ड अशा स्पर्धा होतील.
या स्पर्धेच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व अभ्यासाबरोबर तांत्रिक व प्रात्यक्षिक ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व नियोजन प्र. प्राचार्य डॉ. बी. बी. संगमे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक प्रा. पी. के. कर्वे यांच्यासह प्रा.डॉ. एस. व्ही. कुंभार, प्रा.सौ. व्ही.ए. जुजारे, प्रा. एस.ए. मुळे, प्रा.सौ. के. ए. नदाफ, प्रा. के.एम. मुजुमदार, प्रा.सौ. पी.एम. स्वामी, प्रा. सौ. एस.के. शिकलगार, प्रा. एम.एस. जुगळे, प्रा.सौ. ए.ए. झळके व विद्यार्थ्यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *