शरद पॉलिटेक्निकमधील ऑरनेट’ स्पर्धा नवोन्मेषाला चालना देणारीविविध राज्यातून १७१४ विद्यार्थी सहभागी

Loading

विजेत्यांना लाखाचे बक्षिस
यड्राव : प्रतिनिधी

शरद इन्स्टिटयूटमध्ये औद्योगिक क्षेत्रात आवश्यक ते तांत्रिक ज्ञान व कौशल्य देण्यात येते. त्यामुळे नोकरीसह उद्योजक निर्माण होण्यासाठी शरद संकुल विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये व ज्ञान देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.ऑरनेट सारख्या तांत्रिक स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला व नवोन्मेषाला चालना मिळते. असे प्रतिपादन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते शरद इन्स्टिटयूट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्नकमध्ये ऑरनेट २के२५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी विविध राज्यातून १७१४ पेक्षा अधिक विद्यार्थ्यी सहाभागी झाले होते.
यावेळी प्रथम वर्षसह विभागनिहाय पेपर प्रेझेंटेशन झाले. यामध्ये थ्रीडी प्रिंटींग इन सिव्हील इंजिनिअरिंग, साव्हीलमधील एआय तंत्रज्ञान, पॉवर सिस्टीममधील एआय, एआय आणि भविष्यातील नोकरी, सायबर सिक्यरिटी, इंडस्ट्री ५.०, उद्योग क्षेत्रातील आधुनिकता अशा विविध ५० विषयांवर शोधनिबंधाचे सादरीकरण झाले.
यावेळी तांत्रिक स्पर्धेमध्ये कॅड क्लॅश, मॉक इंटव्ह्यु, रिव्हर्स कोडिंग (सी लॅग्वेज), क्विझ कॉम्पिटेशन, मॉडेलिंग ऑफ थ्रीडी प्रिंटीग, कोड झेस, वेब विझार्ड (वेब डिझाइन), लेथ वॉर, टेक्निकल क्वीझ, रोबो सोकर अशा विविध स्पर्धा झाल्या.
विजेत्यांना लाखाहून अधिक रक्कमेचे बक्षिस देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन प्रा. बी.एस. ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. ए. वाय. केर्ले यांच्यासह डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *