बहुजन समाजाच्या विकासासाठी धडपडणारे नेतृत्व एसपी कांबळे यांना श्रद्धांजली

Loading

एस पी कांबळे नशीबवान : माजी बालकल्याण सभापती सौ मनीषा गुरव यांचे गौरवोद्गार

आजरा : प्रतिनिधी

अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला तरीही एस पी कांबळे स्वतःच्या पदरात 18 विश्व दारिद्र्य असताना आपला समाज आणि बहुजन समाज यांच्या विकासासाठी धडपडणारे नेतृत्व होते. त्यांनी राजकारणात बेइमानी केली असती तर लाखो रुपये कमावले असते. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे ते होते. राजकारणात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही पण आपल्या मनासारखे झाले आणि नाही तरी आपल्या नेत्यावर विश्वास ठेवणारे नेतृत्व ते आहेत. असे गौरवोद्गार माजी बालकल्याण सभापती सौ मनीषा गुरव यांनी काढले. एस पी कांबळे यांना श्रद्धांजलीपर त्या बोलत होत्या. दरम्यान एसपी कांबळे कार्यकर्त्याच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याच्या पायाजवळ बसून त्याची व त्याच्या कुटुंबाची काळजी घेणारा नेता माननीय जयवंतराव शिंपी साहेब यांच्याकडे पाहिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभापती सौ मनीषा गुरव यांच्या मुखातून एक वाक्य आले कि, ते नशीबवान ठरले.ज्यांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारा नेता मिळाला आज-काल असं नेतृत्व मिळणं सुद्धा दुर्मिळ आहे एसपींच्या बरोबरच्या सहवासामधील खूप काही आठवणी आहेत ज्या सांगता येतील समोर दुःखाचा अंधकार असल्याने मी त्या व्यक्त करू शकत नाही

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *