![]()
आजरा : हसन तकीलदार-

येथील चाफेगल्लीतील रहिवाशी संजय गोपाळ यादव वय वर्षे 45 यांच्या थांबलेल्या कारला कंटेनरने धडक दिली. या अपघातात कारमधील ५ पैकी दोघे गंभीर जखमी असून हा अपघात शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:30 च्या सुमारास हॉटेल मॉर्निंग स्टाच्या समोर घडला. थांबलेल्या चार चाकी वाहनाला अचानकपणे भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली. या अपघातात यादव कुटुंबीय कारमध्ये त्यापैकी दोघे गंभीर जखमी असून त्यांच्या उपचारासाठी लाखो रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी आपल्या सढळ हातानी मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संजय यादव व त्यांचे वडील हे दोघे जखमी आहेत.
संजय यादव यांनी भरपूर कष्टाने शून्यातून आपलं छोटंसे विश्व निर्माण केले आहे. प्रचंड मेहनत करून त्यांनी आपला संसार फुलवला. अचानक नशिबाने पाठ फिरवली आपल्या कुटुंबासमवेत येत असताना हॉटेल मॉर्निंग स्टार समोर थांबलेल्या त्यांच्या चार चाकी वाहनाला कंटेनेरने जोराची येऊन धडक दिली. संजय यादव यांचे वडील कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत तर संजय यादव यांच्यावर कोल्हापूर येथील ऍस्ट्रो आधार हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. संजय यादव हे एकटे कमावते कर्ते पुरुष असल्याने आज त्यांच्या कुटुंबावर आर्थिक आरिष्ठ येऊन ठेपले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून त्यांचा वैद्यकीय खर्च जवळपास 15 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांच्या घरी लहान मुले असल्याने कमावते कर्ते पुरुष कोणीच नाहीत. त्यामुळे हा खर्च त्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. तरी सर्वांनी सढळ हातानी पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मदतीसाठी त्यांचा जी. पे. नं. 9960115205 (चेतन संजय यादव), बँक खाते नं.:-20140444800 (बँक ऑफ महाराष्ट्र) यावर दानशूरांनी मदत करावी. आपली मदत एका कुटुंबाला सावरू शकते. त्या लहान मुलांचा आधार वाचवू शकते.