![]()
व्यंकटराव प्राथमिक विद्यालयात पोषण आहार सप्ताह उत्साहात
आजरा प्रतिनिधी
येथील व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरमध्ये पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ.अलकाताई जयवंतराव शिंपी होत्या.
सकस व संतुलित आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य कशा पद्धतीने सुधारते याची सविस्तर माहिती सौ. शिंपी यांनी आपल्या मनोगततून दिली. या कार्यक्रमात 140 पालक महिलांनी उत्फूर्तपणे भाग घेतला. वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी अक्षरशः मुलांना आज मिळाली.

प्रास्ताविक सौ.आर.एच.गजरकर यांनी केले तर सौ.एन.आर.हरेर, डी.बी. डेळेकर ,नगरसेविका सुमैया खेडेकर ,डॉ.पारपोलकर यांनी आपल्या भाषणात आहारात पालेभाज्यांचे महत्व पटवून सांगितले. यावेळी आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ. प्रियंकाताई अभिषेक शिंपी,व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षिका सौ.व्हि.जे.शेलार , सौ.ए.एस.गुरव,व्यंकटराव प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री.आर. व्ही. देसाई, उपस्थित होते. सूत्रसंचालन.सौ.एल.पी.कुंभार यांनी केले तर
आभार सौ.एन.आर. हासबे यांनी मानले.


