कोल्हापूर : प्रतिनिधी

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई क्लस्टर IXॲथलेटिक क्रीडा स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी केली.२३३ गुणांसह एकूण सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर दुसऱ्या क्रमांकावर नेव्ही चिल्ड्रेन स्कूल,गोवा (११३ गुण) आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यू होरायझन पब्लिक स्कूल,ऐरोली,नवी मुंबई(९४ गुण)राहिले.बक्षीस समारंभ कार्यक्रमासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे रजिस्टर डॉ. विवेक कायंदे,संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती,बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ.एच. एम.नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य श्री. अस्कर अली हे उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील नामांकित सीबीएसई शाळामधील १२१७ खेळाडूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून अनेक विक्रम प्रस्थापित केले. विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण समारंभात सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. विजयी खेळाडूंचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना सस्मिता मोहंती म्हणाल्या,या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक खेळाडूचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या राज्याचे व शाळेचे नाव मोठे करावे.खेळाकडे एक करिअर म्हणून पहावे.” तर वैयक्तिक विजेते खालीलप्रमाणे आहेत. गट १४ वर्षाखालील मुले :वरदराज जगताप (एसपीएमपब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल,पुणे),सर्वेश पाटील (विबग्योरहाय, उचगाव,कोल्हापूर), गट १४ वर्षाखालील मुली :ध्रुविका पवार (अग्रसेनविद्या मंदिर,औरंगाबाद),प्रांजल थोरात (केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल,पुणे) असे तर गट १७ वर्षाखालील मुले :मोहम्मद अरशद (आर्मी पब्लिक स्कूल,दिघी कॅम्प,पुणे),कौशिक चौधरी (दिल्ली पब्लिक स्कूल,मिहान,नागपूर), आणि गट १७ वर्षाखालीलमुली : अश्वीता कळे (एसपीएम पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल,पुणे),वैदेही सुद्रिक (एसएसपीएम श्री.श्री. रविशंकर विद्यामंदिर,मुंबई) तर गट १९ वर्षाखालील मुले : अवनीशगोड्डे (ए.एस.एमएस एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल,पुणे),सुमितकुमार बेहरा (आर्मी स्कूल,कुलाबा,मुंबई),सिद्धार्थगरांडे (पोदार इंटरनॅशनल स्कूल,सांगली), गट १९ वर्षाखालील मुली : निधीकाळे (भवन्सबी.पी.विद्यामंदिर,वाठोडा,नागपुर),रिफातर हमान (शांतिनिकेतन मोरेवाडी,कोल्हापूर),वंदनाठाकूर (जिंदाल विद्या मंदिर,ठाणे) असे आहेत.