संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ला प्रथम क्रमांकाची उदयोन्मुख शाळा पुरस्कार

Loading

मुळशीच्या स्कुलचा जयपूर येथे गौरव

पुणे : प्रतिनिधी-

मुळशी येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल देशातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत असल्यामुळे ‘ स्कु न्यूज मार्फत जयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये ‘ प्रथम क्रमांकाची उदयोन्मुख शाळा 2025 हा सन्मान प्राप्त झाला. जयपूर या ठिकाणी झालेल्या या सन्मान सोहळ्यात संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी प्रमुख अतिथी रवी संतलानी यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. एसजीआयएसचे लकी सुराणा यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. नव्याने सुरू झालेल्या या शाळेने जीवन कौशल्य शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण आणि सामुदायिक व सहयोगी उपक्रम व भविष्यातील गरजा ओळखून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण दिल्याबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्काराबद्दल चेअरमन श्री संजय घोडावत व सेक्रेटरी श्रेणीक घोडावत यांनी विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्राचार्या मिता शर्मा, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि पालकांचेही त्यांनी अभिनंदन केले व आभार मानले. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून शाळेच्या मॅनेजमेंटचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

या सन्मानाप्रति बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, ” चेअरमन संजय घोडावत यांची दूरदृष्टी व संचालिका सस्मिता मोहंती यांचे परिश्रम व विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न यामुळेच हा सन्मान प्राप्त झाला असून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण या सर्व गोष्टीला आम्ही महत्व देतो. असे ते म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *