![]()
आजरा : प्रतिनिधी
पेरणोली ता.आजरा येथील मच्छिन्द्र नारायण कालेकर यांचे आकस्मिक निधन झाले.आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची व नाजूक असणाऱ्या कालेकर कुटुंबियांवर जणू दुःखाचे डोंगरच कोसळले. त्यामुळे कालेकर कुटुंबियांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली.या संदर्भात माहिती घेऊन श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम.एल.चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कालेकर कुटुंबियांची चौकशी केली. पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली.श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड ऍम्बेसिडर माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ.ज्ञानेश्व रमुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमांतर्गत रवळनाथ तर्फे ही मदत देण्यात आली. रवळनाथाच्या या मदतीबद्दल कालेकर कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी संचालक प्रा.व्ही.के.मायदेव,सी.इ.ओ.डी.के.मायदेव यांच्यासह सरपंच सौ.प्रियांका जाधव,कारखाना संचालक उदयराज पवार,वसंत तारळेकर,टी.एस.गडकरी,ग्रामपंचायत सदस्या सुनीता कालेकर,पत्रकार रणजित कालेकर,कालेकर कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.मच्छिंद्र कालेकर हे भूमिहीन शेतमजूर होते. गावी शेतमजूरी आणि पशुपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत.झोपडीवजा घरात राहणारा त्यांच्या आई,पत्नी,मुलगा आणि विवाहीत मुलगी असा परिवार असून गेल्या दोन महिन्यापासून ते आजारी होते.त्यांच्या उपचारासाठी घरातील पशुधनाची देखील कुटुंबियांना विक्री करावी लागली.त्यामुळे कालेकर कुटुंब सर्वबाजूनी आर्थिक संकटात सापडले. रवळनाथ तर्फे नेहमीच समाजातील अपघातग्रस्त,जळीतग्रस्त,गरीब आणि संकटात सापडलेल्या दुर्बल घटकासाठी सहकार्य केले जाते.अशा प्रसंगी माणुसकीच्या नात्याने हतबल होणाऱ्या बांधवाना धीर देण्याचे आणि मायेची उब देण्याचे काम नेहमीच रवळनाथ कडून केले जाते.रवळनाथचे संचालक प्राचार्य डॉ.आर.एस.निळपणकर यांनी देखील वैयक्तिक रुपये अकरा हजारांची आर्थिक मदत दिली.
