धरणगुती येथे सालाबाद प्रमाणे श्री महालक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन

Loading

शिरोळ /प्रतिनिधी :
आपल्या संस्कृती पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दरवर्षी धरणगुत्ती गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा आयोजित केली जाते. यावर्षी सदरची यात्रा शुक्रवार दिनांक 15 ते रविवार दिनांक 17 या कालावधीत संपन्न होणार आहे. गावची ग्रामीण व कृषी संस्कृती जोपासली जावी या हेतूने या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळी पहाटे 4 वाजता देवीच्या मूर्तीस अभिषेक केला जाणार आहे. तसेच दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्याच दिवशी विविध गटातील स्पर्धकांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच सदर दिवशी दूध उत्पादन,वासरू संगोपन, व गोठा व्यवस्थापन स्पर्धा आयोजित केलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्यासाठी ऊस पीक स्पर्धा व भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. सदर दिवशी रात्री वैभव डान्स म्युझिकल नाईट या संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन केलेले असून सायंकाळी भव्य निकाली कुस्त्यांचे मैदानाचे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 17 रोजी बारा वाजता महाप्रसाद असून त्याच दिवशी सायंकाळी झी टॉकीज फेम युवा कीर्तनकार ह. भ. प.शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन आयोजित केले आहे तरी सदर कार्यक्रमांचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री आण्णासो पाटील यांनी केले आहे.

यावेळी शिवराज पवार,दत्तचे संचालक शेखर पाटील,सरपंच विजया कांबळे.मा. सरपंच सुरेश आरगे, भालचंद्र लंगरे, मनोहर माळी, संजय राजपूत, संभाजी भानुसे आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *