![]()
यड्राव : प्रतिनिधी
येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रीकल विभागातील ४९ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीत निवड झाली आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी देखील इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

जगभरात पॉवर आणि एनर्जी सेक्टर, नवीकरणीय ऊर्जा, ऑटोमोबाईल आणि ईव्ही उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि इलेक्ट्रिकल सिस्टम डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरण निर्मिती अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळली आहे.
यामध्ये सुझलॉन पॉवर, फोर्स मोटर्स, व्हँडरलांडे, सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स, यझाकी इंडिया, अकॅडेमॉर, विप्रो पारी, जॉन डिअर, शक्ती ऑटो कंपोनंटस, राणे मद्रास यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी, प्रॉडक्शन डिपार्टमेंट, डिझाईन डिपार्टमेंट, कॉलिटी मॅनेजमेंट तसेच पॅनेल सुपरवायझर अशा विविध पदांसाठी निवड केली आहे.
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग अधिकारी प्रा. नेहा प्रसून म्हणाल्या, महाविद्यालयातील बहुतांशी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट विभागामार्फत झाली आहे. उर्वरीत विद्यार्थी इंटरशीपच्या माध्यमातून विविध कंपन्यामध्ये जॉईन झाले आहेत. आमचे विद्यार्थी केवळ तांत्रिक ज्ञानातच नव्हे तर समस्या सोडविण्याच्या कौशल्यातही पारंगत आहेत. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निग, व्हॅप अंतर्गत अद्यावत कौशल्यांचे प्रशिक्षण, ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव ह्या सर्वांचा उपयोग कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे डिन प्रा. ए.बी. जाधव, अधिकारी प्रा. नेहा प्रसून, प्रा. विद्या पाटील यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.