डॉ.जे.जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये ‘मृदगंध २०२६’ वार्षिक बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

 ‘मृदगंध २०२६’ : कार्यक्रमास पोलीस उप अधीक्षक उपस्थित 

जयसिंगपूर : प्रतिनिधी-

येथीलडॉ.जे.जे.मगदूमअभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मृदगंध२०२६’वार्षिक बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा उत्साहातपार पडला.या कार्यक्रमात जयसिंगपूर उपविभागीय पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून ब्वाग इंडिया लिमिटेड चेअरमन श्री.हणमंतराव गायकवाड सुद्धा ऑनलाइन उपस्थित होते. महाविद्यालयाचे सण १९९७ सालचे माजी विद्यार्थी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑन CEA,USA चे श्री.रवींद्र वेल्हाळ, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे,महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील नामांकित सिने अभिनेत्री शिवाली परब हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजयराज मगदूम,व्हाईस चेअरपर्सन ऍड.सोनाली मगदूम,कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे, डॉ.हरीश आनंद आणि डॉ.प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 कौशल विकास शिक्षणावरती भर देत विद्यार्थ्यांनी परिपूर्ण बनले पाहिजे दररोज नवीन शिकण्याची जिज्ञासा मनी बाळगली पाहिजे,असा उपदेश देऊन मी कसा घडलो हे विध्यार्थ्यांना सर्व मान्यवरांनी सांगितले. तर कांही दिवसातच मी कॉलेजला भेट देईन असे श्री.हणमंतराव गायकवाड यांनी आश्वासन दिले. माजी विद्यार्थी श्री.रवीद्र वेल्लाळ,यांनी डॉ. जे.जे.मगदूमअभियांत्रिकीच्या शिस्त व नम्रता या शिकवणीमुळे आम्ही मोठे झालो अशी कृतज्ञता व्यक्त केली. यावर्षी महाविद्यालयाकडून दिला जाणारा डॉ.जे.जे.मगदूम स्मृती बेस्ट आउटगोइंग पुरस्कार आर्टिफिसिअल इंटेलिजन्ट अँड डेटा सायन्स या विभागाच्या कु. ऋतुजा महाडिक हिने पटकावला तर त्याच विभागाच्या कु. साक्षी तिकोडे हिने डॉ. प्रभा जे. मगदूम बेस्ट अकॅडमी एक्सलन्स पुरस्कार पटकावला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगती सोबत कॉलेजचे नाव मोठे करावे,आपल्या व्हिजन वर आत्मविश्वास ठेवला तर ते साध्य होण्यास कोणताही अडथळा येणार नाही.यश हे असे सहज मिळत नाही तर ते किंबहुना अनेक अपयशानंतर ते साध्य होते.फक्त त्यासाठी कठोर परिश्रम आणि चिकाटीची गरज लागते.असे यावेळी रवींद्र वेल्हाळ म्हणाले. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी प्राचार्या मॅडम यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवाल ऐकल्यानंतर महाविद्यालयाने वर्षभरामध्ये केलेली प्रगती आणि कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले. त्यांनी महाविद्यालयाच्या सर्व घटकांचे कौतुक केले. विध्यार्थानी करिअरला जितके महत्व तितकेच आपल्या तब्येतीला देण्याची गरज आहे असे सांगितले. तर महाविद्यालयाच्या प्रगती बाबत डॉ.सोनाली मगदूम यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील नामांकितसिने अभिनेत्री शिवाली परब यांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह भरला. स्वागत चेअरमन डॉ.विजय मगदूम यांनी केले, अहवाल वाचन प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी केले. कु. ऋतुजा महाडिक हिने आभार मानले.  प्राचार्यां डॉ.शुभांगी पाटील आणि डीन स्टुडन्ट वेलफेयर श्री.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख,सर्व क्लबचे प्रमुख, प्राध्यापक,प्राध्यापक केत्तर कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.