सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्य दिग्दर्शिका डॉ. राजश्री खटावकर उपस्थित

जयसिंगपूर : प्रतिनिधी-
येथील डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्य दिग्दर्शिका डॉ. राजश्री खटावकर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. यावेळी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी एआय वर प्रभुत्व असायला हवे यासाठीचे मार्गदर्शन केले. तसेच व्हाईस-चेअरपर्सन ऍड. डॉ. सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल अत्यंत हृदयस्पर्शी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांनी केले. महाविद्यालयाच्या न्यूजलेटरचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि कलागुणांचे सादरीकरण केले. नृत्य, गाणी, नाटिका आणि विनोदी स्किट्सने संपूर्ण महाविध्यालय परिसर मंत्रमुग्ध झाले.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस-चेअरपर्सन एड. डॉ. सोनाली मगदूम, डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरीशा नंद के. एस. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार एस. पाटील, उप-प्राचार्य सतिश किलजे, डॉ. प्रियंका गायकवाड, डिप्लोमा विभाग प्रमुख प्रा. सौ. एस. व्ही. मगदुम आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. सौरभ समडोळे, प्रा. काशिनाथ हुलवान यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. ऐश्वर्या पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी कु. हार्दिक कोळी यांनी केले.