श्री भरत अर्बन सहकारी बँकेचा उद्या रविवारी 56 वा वर्धापन दिन

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील श्री भरत अर्बन को-ऑपरेटिव बँकेचा 56 वा वर्धापन दिन उद्या रविवारी सकाळी साजरा होत असून सकाळी 9.15 वाजता येथील प्रधान कार्यालयात या वर्धापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाने कळवले आहे. सांगली महानगरपालिकेचे नूतन महापौर पै. धीरज सूर्यवंशी तसेच जयसिंगपूर पालिकेचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह उपनगराध्यक्ष सौ अनुराधा आडके, शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ योगिता कांबळे आणि उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांचा सत्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी 1917 साली वसवलेल्या या जयसिंगपूर नगरीमध्ये स्थापन केलेल्या आपली बँक भरत बँक या संस्थेचा वर्धापन दिन होत असून त्यानिमित्त सकाळी शांती पूजा आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर भरत कॅशबोंडचेही वितरण होत आहे. भरत बँकेच्या एकूण ठेवी 300803. 93 असून एकूण गुंतवणूक 14 हजार 236.55 आहेत. तर एकूण कर्जे १८१६३.12 असून भाग भांडवल व राखीव निधी 28 82. 06 आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली. भरत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा नृसिंह वाडी,गणेशवाडी,नांदणी, शिरोळ, हेरले,टाकळी, पेठ वडगाव, रेंदाळ या ठिकाणी असून सोने तारण वाहन खरेदी सह विविध कर्ज योजना सुरू आहेत अशी ही माहिती ते कळवितात. रविवारी होणाऱ्या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष पै विठ्ठल मोरे यांच्यासह चेअरमन श्रीवर्धन पाटील,व्हाईस चेअरमन प्रसन्न कुंभोजकर आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.