![]()
यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ३४ विद्यार्थ्यांची पी.एच.एन. टेक्नॉलॉजीस व २६ विद्यार्थ्यांची अकॅडेमोर या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर, एआयडिएस, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, अॅटोमेशन-रोबोटीक्स विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.
महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्समधील रुमयी झांबरे, सानिका डांगे, प्रेरणा सगलगे, प्रथमेश चव्हाण, श्रेणिक माने, अथर्व धुमाळ, नेहा हलवाई, धनश्री कोरे, प्रतिक्षा गिरमल, अकाश पाटील, हर्षदा पवार, हर्ष बैलुरकर, निरज लंगडे, अब्दुलरहमान नाईकवाडी, साक्षी भिसे, तेजस माळी, रिया पिंजारी, अक्षय माणगांवकर, सृष्टी गुगरी, हर्ष पवार इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रणव पाटील, मनिषा येन्नापे, श्रीजीत नाडगौडा, सुरज चौगुले, समिक्षा हिंगणगावे, शंतनु जोशी, रोहित सनतौर, समृध्दी बारवाडे, तपस्या जाधव, शुभम वनसाळे, श्वेता सांगले, स्वप्निल शिंदे, वैष्णवी भोसले, मोहंमद पटेल, महेश अवलक्की, ऋतुराज पाटील, प्राची कांबळे,ए.आय.डि.एस.मधील सुदेश पाटील, उत्तम गिरी, महंमदहसन इमत्तुर, श्रेया मगदूम, हर्षदा नरदे, हर्ष गोंदकर, उत्तम गिरी, अनुजा कल्याणी, तपस्या जाधव, निखिल सुतार, साहिल विंगकर, धनश्री कांबळे, मेकॅट्रॉनिक्स मधील दिपक माळी, सलमान भंडारी, सोहम ढगे, माळी दिपक, इलेक्ट्रीकलमधील वैष्णवी माने, अनिकेत पाटील, अनिकेत कु-हाडे, स्वरुप पाटील, रणवीर पाटील, मेकॅनिकलमधील मिलिंद कोगनोळे, अॅटोमेशन-रोबोटीक्स विभागातील यशवर्धन शिरगावे या विद्यार्थ्यांचा दोन्ही कंपरनीत निवड झाली.
पी.एच.एन.टेक्नॉलॉजीस व अकॅडेमोर हि कंपनी एक शिक्षण-तंत्रज्ञानावर आधारित अग्रगण्य कंपनी आहे. एज्युटेक, शिक्षण, ए.आय.रोबाटीक्स, आयओटी, ड्रोन यासह विविध क्षेत्रात काम करते. ई लर्निंग, एज्युटेक, एआय बेसड शिक्षण मॉडेलच्या वापरावर भर, मशिन लर्निंग, डाटा सायन्स आदी क्षेत्रात काम करते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे डिन प्रा. ए.बी. जाधव, प्रा. नेहा प्रसून, प्रा. विद्या पाटील यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
