झाड तोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद : शासकिय जागेतील झाड विनापरवाना तोडले

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी-

येथील कॅनरा बँकेचे शेजारी, रस्त्याच्या कडेला शासकिय जागे मध्ये असलेले झाड तोडणाऱ्याविरुद्ध जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 चे कलम 21 प्रमाणे हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चंद्रशेखर (चंदू) लक्ष्मण माळी, रा. गल्ली नं. 13, जयसिंगपूर यांचे गल्ली नं.13, जयसिंगपूर असे आरोपीचे नाव आहे. तर चेतन दत्तात्रय कांबळे, व.व.37, व्यवसाय-नोकरी, रा. घर नं. 433/1, सिध्दार्थनगर, पेठ वडगांव, ता.हातणकणंगले, जि. कोल्हापूर, मो.नं. 9665939311 यांनी दिले फिर्यानुसार हा गुन्हा नोंद झाला आहे.

दि.16/07/2025 रोजी 17.45 वा. पूर्वी, 13 वी गल्ली, कॅनरा बँकेचे शेजारी, रस्त्याच्या कडेला शासकिय जागे मध्ये यातील संशयित आरोपीने शासकिय जागे मधील डोंगरी झाड वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय तोडले. जयसिंगपूर नगरपरिषद, जयसिंगपूर यांचे तर्फे फिर्यादी यांनी फिर्याद वरून गुन्हा दाखल केला. गुन्हयाची प्रथम खबरी अहवाल मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट, जयसिंगपूर यांच्याकडे पाठविण्याची तजवीज ठेवली असून अंमलदार- जे.व्ही. पाटील, पो.हे.कॉ.ब.नं. 212 यांनी दाखल केल्याचे समजते. पुढील तपास अंमलदार – म.पो.ना.ब.नं. 2077 विजया पाटील करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *