![]()
यड्राव / प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ३ विद्यार्थ्यांची न्युमेट्री टेक्नॉलॉजीज, पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील श्रावणी खडगे, तौफिक बडकर, सप्रिया सामंत या विद्यार्थ्यांना संधी मिळाली.
न्यूमेट्री टेक्नॉलॉजीज ही भारतातील एक आघाडीची वेब आणि मोबाइल अॅप डेव्हलपमेंट कंपनी आहे. जी यूएसए, यूके आणि कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, आफ्रिका, युरोप, युएई, भारत इत्यादींना प्रत्येक उद्योग क्षेत्रात आयटी सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनीचे मुख्याल. पुणे येथे असून कंपनी डेटा-चालित, वापरकर्ता-अनुकूल सॉफ्टवेअर उत्पादने, एआय, डेटा सायन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स तसेच एंड-टू-एंड उत्पादन विकास आणि आयटी सल्लागार सेवा देते.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निग अंतर्गत सुरू असलेल्या ॲक्टिविटी स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव करून घेण्यात आला आहे. तसेच जर्मन, पायथॉन, सी अशा विविध भाषांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा प्रसून यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


