![]()
यड्राव : प्रतिनिधी








येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांची विप्रोपारी लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅटोमेशन अॅण्ड रोबोटिक्स विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली. मेकॅनिकलमधील मिलिंद कोगनोळे, अभिषेक चौगुले, मेकॅट्रॉनिक्स -सोहम चव्हाण, अॅटोमेशन अॅण्ड रोबोटिक्स- रेवती मडके, इलेक्ट्रीकल- सिध्दांत पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग- सुरज चौगुले, अंकितकुमार चौगुले, आकाश अरदाळे या विद्यार्थ्यांना संधी मिळाली. विद्यार्थ्यांची कंट्रोल सॉफ्टवेअर, डिझाईन व कंट्रोल डिझाईन विभागात काम करण्यासाठी निवड झाली आहे.
विप्रो पारी कंपनी ऑटोमेशन आणि रोबोटिक्समधील सर्वोत्तम व अग्रेसर आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनी फिजिकल ऑटोमेशन प्रकल्प आणि डिजिटल फॅक्टरी उपक्रमांसह अनेक औद्योगिक ऑटोमेशन सोल्यूशन्स ऑफर करते. कंपनी २५ वर्षांहून अधिक काळ जागतिक टर्नकी इन्स्टॉलेशन प्रदान करते. कंपनी २५ हून अधिक देशांमध्ये काम करते. वार्षिक ५०० करोड पेक्षा अधिक उलाढाल आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निग अंतर्गत सुरू असलेल्या अॅक्टीव्हिटी स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव करून घेण्यात आला आहे. तसेच जर्मन, पायथॉन, सी अशा विविध भाषांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा प्रसून यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.