![]()
श्रावण गुरव यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

सातवणे : प्रतिनिधी-
मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षणसंस्था नव्हेत,तर त्या आपल्याभाषेची,संस्कृतीची,परंपरेची वाहक आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक पालक इंग्रजी माध्यमाच्या आहारी जात असून,मराठी शाळांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवण्याचा निर्णय घेतल्यास,या शाळा पुन्हा बहरतील. मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळाल्यास संकल्पना स्पष्ट समजतात, आत्मभान निर्माण होतं आणि भाषेवर प्रेम जपलं जातं. मराठी शाळा वाचतील तरच मराठी भाषा आणि संस्कृतीची समृद्धी होईल. अभिजाततेच्या घोषणेसोबत कृतीही हवी. माजी विद्यार्थी श्रावण गुरव म्हणाले हे माझे कर्तव्यच मी समजतो, प्रत्येक ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा सुधारणे गरजेचे आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने गावोगावी खारीचा वाटा का असेना उचलवा असे आवाहन त्यांनी केले.
सातवणे येथे लेखक,बिजनेस कोच श्रावण गुरव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, या प्रसंगी सुनील गाडे महाराज, श्रावण गुरव,शिवाजी गावडे आणि संपूर्ण शिक्षकवर्ग,टिम श्रावण गुरव डेव्हलपमेंट कम्युनिटी आदी उपस्थित होते.