![]()
हुपरी / प्रतिनिधी
गावच्या सर्वांगीण विकासात्मक धोरण राबवण्यासाठी रांगोळी ग्राम पंचायतीच्या वतीने गावचे सर्वेसर्वा प्रदीपरावजी देसाई यांच्या संकल्पनेतून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सभेमध्ये दारूबंदी व अवैधधंदे इतर अश्या प्रमुख सात मुद्यांवरती चर्चा झाली. व्यसनाधीनते मध्ये दारु हा प्रमुख घटक असून तरुण वर्गामध्ये मध्ये दारू व गांज्या सेवन ही व्यसने वाढली आहेत. ही अत्यन्त चिंतेची बाब असून आगामी काळातआव्हाने पेलायची असल्यास तरुण पिढी ही सक्षम निर्व्यसनी असणे हे अपेक्षित आहे. समाज व राष्ट्राचे भवितव्य निर्व्यसनी युवकच घडवू शकतात असे प्रतिपादन प्रदीपराव देसाई यांनी केले.

सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी बंदी, उत्सवकाळात कमीखर्च करून गावच्या विकास कामात आर्थिक मदत, तसेच जातीय सलोखा, गाव प्रगती पथावर नेण्यासाठी सर्व समावेशक समिती स्थापन करणे, गाव पातळी वरील शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, पर्यावरण संवर्धन, आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपयोजना करणे अश्या मूलभूत मुद्द्यावरती हात उंचावून टाळ्यांचा गजरात एक मुखाने मंजुरी देण्यात देण्यात आली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ग्राम सभेमध्ये यंदा प्रथमच कोरम पूर्ण झाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.