![]()
यड्राव : प्रतिनिधी
येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १६३ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. रक्तदान शिबिराचे उदघाटन आरोग्य अधिकारी डॉ. एल.बी. सातपुते व जनसंपर्क अधिकारी गौतम बागवाडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.
डॉ. सातपुते व श्री बागवाडे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. यामध्ये रक्तदानाचे फायदे, रुग्णांसाठीचे महत्व याची विद्यार्थी व प्राध्यापकांना माहिती दिली.
शरद इंजिनिअरिंग, शरद पॉलिटेक्निक, शरद कृषी, शरद आयटीआय, शरद सायन्स अॅण्ड कॉमर्स, शरद हॉस्पिटल, शरद फार्मसी, शरद नर्सिंग, शरद स्कूल, महाविद्यालयातील प्राध्यापक, स्टाफ, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी यांनी रक्तदान केले.
यावेळी प्राचार्य बी.एस. ताशिलदार, प्रभारी प्राचार्य डॉ. बाहुबली संगमे, प्राचार्य डॉ. सारिका कोळी, प्राचार्य रमेश भरमगोंडा, प्राचार्य गौरी फडके, प्राचार्य श्रध्दा कांबळे, उपप्राचार्य मनोज कुंभार यांच्यासह सर्व डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थीत होते.
संजीवन ब्लड बँकचे सचिन कवडे, अनिल सरनोबत, निकीता खंडागळे, वैष्णवी पाटील, श्रध्दा तळेकर, साक्षी गांजवे, स्पृहा साळसकर, स्नेहल शेळके उपस्थीत होते.
शिबिरासाठी महावीर चौगुले, शितल चावरे, रमेश माने, एस. पी. उदगांवे, दादासाहेब मगदूम यांच्यासह सर्व प्राध्यापक, स्टाफने परिश्रम घेतले.
