गणपतराव पाटील (दादा ) यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Loading

शिरोळ / प्रतिनिधी

एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे च्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा 'पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार' श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना जाहीर झाला आहे. पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून दि.25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता फिरोदिया सभागृह, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

पर्यावरण क्षेत्रात गेली 17 वर्षे एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया ही संस्था काम करीत असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना 'पर्यावरण भूषण' आणि 'पर्यावरण गौरव' पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये वर्षानुवर्षे क्षारपड असलेली जमीन सुपीक करण्याच्या ध्येयाने गणपतराव पाटील यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच पर्यावरण क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत याचा विचार करून हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. श्री सिद्धेश कदम यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे व खजिनदार सचिन पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *