![]()
शिरोळ येथे चर्मकार समाजाच्या सांस्कृतिक हॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न
शिरोळ : प्रतिनिधी
चर्मकार समाजातील तरुणांनी पारंपारिक व्यवसायात न गुंतता उच्च शिक्षण घेऊन समाजाचे नाव उज्वल केले पाहिजे. चर्मकार समाजाच्या सांस्कृतिक हॉलचे काम पूर्ण झाले आहे. यापुढेही या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी देऊ, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
६७ लाख ३३ हजार रुपयांच्या निधीतून प्रभाग क्र. २ मधील चर्मकार समाज स्मशानभूमीत निवारा शेड व सांस्कृतिक भवननाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अशोकराव माने होते.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, श्री दत्त कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, प्रताप उर्फ बाबा पाटील, लक्ष्मण भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित केलेल्या डॉ. दगडू माने यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी असलेले आ. डॉ. अशोकराव माने म्हणाले, कोल्हापुरी चप्पलचे पेटंट चोरण्याचे प्रयत्न सुरू असून त्याविरोधात लढा उभारला जाईल. पक्षभेद व गटतट विसरून आ. यड्रावकरांसोबत तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितलं.
कार्यक्रमास सुहास राजमाने, प्रकाश गावडे, रावसाहेब मलिकवाडे, एन. वाय. जाधव, बजरंग काळे गुरूजी, गोरखनाथ माने, विजयसिंह माने-देशमुख, राजेंद्र दाभाडे, राजेंद्र प्रधान, अॅड. अनिकेत भंडारे, पंकज माने, योगेश माने, गणपती माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..

