![]()
कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टर्स नियुक्त करा; शिवसेना (उबाठा) ची मागणी
आजरा / हसन तकीलदार
मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे नवीन डायलेसिस सेंटर सुरु करणेत आले आहे. त्याबद्दल सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.सर्वसामान्य,गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात डायलेसिसचा खर्च न परवाडणारा आहे.
ग्रामीणरुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु झाल्यामुळे सर्वसामान्य, गरीब रुग्णांना याचा चांगलालाभ होत आहे. परंतु या सेंटरमध्ये जर एखादा रुग्ण अस्वस्थ झाला किंवा प्रकृती गंभीरझाली तर त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एम.डी. मेडिसिन डॉक्टर उपलब्ध नाही. यासाठी रुग्णालयात कायमस्वरूपी एम.डी. डॉक्टर नेमण्यात यावा अशी मागणी शिवसेना (उबाठा) ने केली आहे. तसे मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक सी.पी.आर. कोल्हापूर यांना शिवसेना (उबाठा) तर्फे देण्यात आले.
निवेदनावर तालुकाप्रमुख युवराज पोवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, हरिश्चंद्र व्हरकटे, अनपाल तकीलदार, बिलाल लतीफ, रवी सावंत, पांडू केसरकर, बबन चौगुले आदींच्या सह्या आहेत.या बरोबरच रुग्णालयात अनेक ग्रामीण भागातून लहान मुलेमुली आजारी पडल्यानंतर त्यांचे पालक उपचारासाठी येथे घेऊन येतात. परंतु या ठिकाणी कायमस्वरूपीबालरोग तज्ञ नसल्यामुळे या बालकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात अथवा गडहिंग्लजला न्यावेलागते, खाजगी दवाखान्यातील उपचार हे गरीब, सामान्य कुटुंबाला परवडणारे नाही. कायमस्वरूपीबालरोतज्ञ डॉक्टर नसलेने लहान मुलाबरोबर पालकांचेही हाल होतात. त्यांना अनेक समस्यांनातोंड द्यावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी बालरोग तज्ञ व एम.डी.मेडिसिन डॉक्टरांची नेमणूककरावी असे या निवेदनात नमूद आहे.

