![]()
उमगाव न्हावेली च्या डाटा ऑपरेटर चा मनमानी कारभार
ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर दीपक गावडे याच्या विरोधात संताप उसळला
चंदगड / तातोबा गावडा
उमगाव न्हावेली या चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये डाटा ऑपरेटर चा मनमानी कारभार सुरू असून या डाटा ऑपरेटर चा निषेध ग्रामस्थांनी व्यक्त केला. डाटा ऑपरेटर दीपक गावडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात संतापाची लाट उसळत आहे. प्रशासनाने या दीपक गावडे ऑपरेटरची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

ग्रामपंचायत प्रतिनिधी सह ग्रामस्थांची संगणक विभागाशी संबंधित कामे करण्यास उमगाव ग्रामपंचायत चे डाटा ऑपरेटर दीपक गावडे हे टाळाटाळ करतात. त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाचे काम सोडून दुसरीच कामे वैयक्तिकरित्या दीपक गावडे करतात असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणामध्ये दिसून येणारा प्रकार या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जाणवत आहे. डाटा ऑपरेटर दीपक गावडे याला काही राजकीय लोकप्रतिनिधी पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामपंचायत मध्ये आलेल्या नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या या डाटा ऑपरेटर दीपक गावडे याला प्रशासनाने कारवाई करून त्याचे डोके जाग्यावर आणावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.


