शब्दगंध साहित्य परिषद यांच्या वतीने जागतिक देहदान दिना दिवशी अनेक मान्यवरांचा सत्कार

शब्दगंध साहित्य परिषद यांच्या वतीने जागतिक देहदान दिना दिवशी अनेक मान्यवरांचा सत्कार

Loading

शिरोळ/प्रतिनिधी:
शब्दगंध साहित्य परिषद शिरोळ यांच्या वतीने श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव यांच्या घरी 13 जून जागतिक देहदान जागृती दिन म्हणून साजरा केला गेला. त्यानिमित्ताने समाजामधील वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे शिरोळ व परिसरातील व्यक्तींचा सन्मान अनिलकुमार यादव व उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

जीवनात आपल्या स्व इच्छेने अनेक दान करत असतात. ज्या प्रकारे रक्तदान मृतवंत शरीरामध्ये प्राण संचारण्याची काम करते, त्या प्रकारे देहदान हे वैद्यकीय अध्ययन व संशोधनासाठी जीवनदायी महादान ठरते. आज देहदान ही बदलत्या काळाची गरज आहे. म्हणून मरणोत्तर देहदान सर्वश्रेष्ठ समले जाते. कारण ते एक नव्या युगाचे महान कार्य आहे. त्यासाठी जात धर्म असा कोणताही भेद नाही. उलट देहदानाचे आणि अवयव दानाचे माणुसकीच्या नात्याने महान कार्य करून वैद्यकीय शिक्षण व संशोधनात मोलाचा वाटा उचलता येतो. तर अवयव दानाने आपल्या मरणानंतरही एखादाच्या जीवनात आपण जिवंत राहू शकतो. यासाठी सर्वांनी देहदान अवयवदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते बाबासाहेब नदाफ यांनी केले. यावेळी राजेंद्र प्रधान यांनी देहदान व अवयव दान याची शपथ सर्वांना दिली.

डॉक्टर दगडू माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व देहदान, खंडेराव जगदाळे यांना राज्यस्तर शिक्षक संघटक, चंद्रकांत भाट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त, राजेंद्र प्रधान नाट्य कलाकार, उदय शिरोळकर कवी व शीघ्र कवी, संजय कोळी संतोष कोळी गायक व वादक, शहाजी काळे माजी सैनिक संघटन, नामदेव माने दारूबंदी केंद्र चालक, सुनील माने व अनिल माने सर्पमित्र, दिगंबर सकट दिन दलित राज्यस्तर संघटन, अनिल लोंढे अन्यायाविरुद्ध सतत लढा, र.जी. मुळीक ज्येष्ठ नागरिक संघटन, मारुती कोळी गोंधळ व भारुड कला जोपासणे, शिवानंद कांबळे पुरोगामी विचार, शिवाजी पाटील कौलकर , एस एस पाटील, काशिनाथ भोसले, उदय मोरे, श्रीकांत माळकर यांना व्याख्याते, सचिन पाटील क्रीडा विभाग, सचिन बनसोडे देहदान व अवयवदान अशा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन पत्रकार सुनील इनामदार यांनी केले. आभार संजय सुतार यांनी मानले.
यावेळी डी. बी. चव्हाण, धनाजी बापू नरदेकर, अविनाश उर्फ पांडुरंग माने, विराजसिंह यादव, भीमराव अतिग्रे, बाळासाहेब कोळी, बापूसो गंगधर ,देवाप्पा पुजारी, संजय चव्हाण, हेमलता जाधव, दीपक गावडे, अमर माने, खंडेराव हेरवाडे व शिरोळ मधील नागरिक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *