उत्तुर कडगाव पिंपळगाव रस्ता सुधारणा काम पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे

उत्तुर कडगाव पिंपळगाव रस्ता सुधारणा काम पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे

Loading

सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांच्या पाठपुराव्याला यश

आजरा तालुका प्रतिनिधी / राजाराम कांबळे .

गेली अनेक दिवस उत्तूर ते कडगाव आणि उत्तुर ते पिंपळगाव पर्यंतचा रस्ता म्हणजे अपघातांचा सापळा बनला होता. जुना रोड उकरून टाकल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते. या समस्येकडे लक्ष्यवेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी उत्तुर बस स्टॅन्ड रोडवर दिनांक १४ मे रोजी आंदोलन केले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आजरा तहसील कार्यालयात आज दिनांक ५ जून रोजी बैठक झाली. या बैठकीत उत्तूर – कडगाव- पिंपळगाव रस्ता सुधारणा काम पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते. गारगोटीचे गडहिंग्लज मार्गाबाबतच्या तक्रारींसाठी बैठक घेण्याचे ठरल्यानुसार ही बैठक संपन्न झाली. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे.

तहसीलदार समीर माने नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासोबत शासनाचे प्रतिनिधी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आर के चतुर्वेदी आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे खिलका व विनोद पतंगे यांच्यासोबत महामार्ग शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिवाजी गुरव संजय घाडगे कृष्णा सावंत यांची संयुक्त बैठक झाली. दिनांक 14 मे रोजी उत्तुर येथील कमानीजवळ चौकामध्ये उपोषण आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान आज झालेल्या बैठकीत हा रस्ता नव्याने बांधकाम करण्याचे काम आजरा व गडहिंग्लज सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे होते. मात्र कामाच्या दर्जाबाबत तक्रारी होत्या. या निष्कृष्ट दर्जाच्या अनुषंगाने आंदोलकांशी या बैठकीत चर्चा झाली. गारगोटी गडहिंग्लज हा दर्जेदार रस्ता दोन्ही गावातील जनतेसाठी गरजेचा आहे असे या बैठकीत आंदोलकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन हा रस्ता पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग करण्याबाबतची सकारात्मक चर्चा झाली.

या प्रश्न आवश्यकता भासल्यास पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन शासकीय प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दिले. आंदोलनामुळे ताबडतोब रस्ता काँक्रिटीकरण सुरू केले असे सांगताना शिवाजी गुरव यांनी शासकीय अधिकारी आणि प्रतिनिधींचे आभार मानले. तसेच बैठकीच्या शेवटी जनतेच्या हिताचे निर्णय घेणे हेच योग्य आहे अशी कृतज्ञता संजय घाटगे यांनी व्यक्त केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *