![]()
बसवान खिंडीत सोमवारी रात्री निघृण खून

जयसिंगपूर : प्रतिनिधी
निमशिरगाव ता. शिरोळ येथील अविनाश ओमगोंडा पाटील ( गोंडाप्पा) वय 34 वर्षे येथील बसवान खिंडीत सोमवारी रात्री निघृण खून झाल्याची घटना मंगळवारी दि.२७ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती समजताच जयसिंगपूर पोलिसासह घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, श्वानपथक दाखल झाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निमशिरगाव येथील अविनाश ओमगोंडा पाटील यांचा सोमवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. बसवान खिंड येथील पोलीस गोळीबार मैदान कडे जाणाऱ्या डोंगरावर हा खून झाला.जयसिंगपूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

