आजरा महाविद्यालयात प्रवेशासाठी मदत केंद्र स्थापन

Loading

आजरा / हसन तकीलदार

चालू वर्षीची इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु असून यासंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरणेस मदत होण्यासाठी आजरा महाविद्यालय आजरा येथे मदत केंद्र स्थापन केले आहे. व्होकेशनल विभागाचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत.अशी माहिती प्राचार्य डॉ. ए.एन. सादळे यांनी दिली. 

आजरा तालुक्यातील एकही विद्यार्थी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे व विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार कॉलेज व शाखा निवडता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. महाविद्यालयामार्फत मुलांना फॉर्म भरून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत गोंधळून जाऊ नये . प्रत्येक विद्यार्थ्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात मदत केंद्र स्थापन केले आहे. प्रत्येक शाखेनुसार संबंधित शिक्षकांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही अडचण असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन प्राचार्य डॉ. ए.एन.सादळे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *