![]()
जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील डॉ.जे.जे.मगदुम फार्मसी कॉलेज मधील बी. फार्मसी अंतिम वर्ष 2024-25 बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि. १७ मे रोजी संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी चार वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला आणि भावनिक वातावरणात एकमेकांचा निरोप घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून स्वदेशी फार्माचे श्री. रावसाहेब पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या. फार्मासिस्ट म्हणून जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शितलकुमार एस. पाटील यांनी “ही बॅच नेहमी लक्षात राहील. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून जीवनात पुढे जाताना प्रामाणिकपणा, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व विसरू नका,” असे मार्गदर्शनही केले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. सतीश किलजे आणि डॉ. प्रियंका गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमात ‘बेस्ट आऊटगोईंग स्टुडंट’ हा बहुमान कु. प्रतिक कुन्नूरे या विद्यार्थ्याला देण्यात आला. त्याच्या सर्वांगीण कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. या विशेष दिवशी महाविद्यालयाच्या वार्षिक मासिकाचे – ‘इन्स्पिरिया 2025’ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. जे. जे. मगदुम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम व उपाध्यक्ष ऍड. डॉ. सोनाली मगदुम यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी भवितव्याबाबत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. सौरभ समडोळे व प्रा. ऐश्वर्या पाटील यांनी केले.

