![]()
जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील राजश्री फाउंडेशन संचलित दीप पब्लिक स्कूलची सी. बी.एस. ई. बोर्ड १० वी परीक्षेच्या १००% निकालाची परंपरा यावर्षीही कायम आहे. १० वी निकालाच्या उज्वल यशामध्ये कु. अंजली भागवत या विद्यार्थीनीने ९२% गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकाविला तर कु.श्रीतेज खोंद्रे हा विद्यार्थी ९१. ६ % गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आला. कु. हर्ष पाटील८६.६,सिद्धी कोल्हापुरे८५.५, झेबा महब्री ८५.६,संदीप कोळेकर ८५.४, दिव्या लट्टी ८४.२ व मंथन गावडे ८३. ४ % यांनी ८०% हून जास्त गुण मिळवून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सी.एफ.ओ. डॉ. सुनील आडमुठे, कॅम्पस डायरेक्टर संदीप रायान्नावार, प्राचार्य नमिता जैन, प्राध्यापक व शिक्षक यांचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल विशेष अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशात शाळेचा मोठा वाटा असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांची शाळेबद्दल ची आत्मीयता, मुलांकडून अभ्यास करून घेण्याची कला यामुळेच आमची मुले यश संपादन करू शकली आहेत तसेच शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगण, स्केटिंग ट्रॅक व क्रीडा निपुण शैक्षणिक गुणवत्ता यामुळेच आमचे विद्यार्थी यश मिळू शकले असे पालकांनी मत व्यक्त केले. उज्वल यशासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश दिप पब्लिक स्कूलमध्ये निश्चित करावा असे ही आवाहन केले.

