चंदगड तालुक्याचा निकाल 97.65 टक्के

चंदगड तालुक्याचा निकाल 97.65 टक्के

Loading

44 विद्यालयांचा निकाल शंभर टक्के

चंदगड / प्रतिनिधी

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या एस. एस. सी. परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. दहावी परीक्षेचा चंदगड तालुक्याचा निकाल 97 . 65 टक्के इतका लागला. तालुक्याच्या एकूण 69 माध्यमिक विद्यालयामधून 2352 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होतो . त्यापैकी 2344 विद्यार्थी परीक्षेला बसले यातील 2289 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 44 विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.

शिवराज विद्यालय महिपाळगडचा सर्वात कमी निकाल 52 .38 % इतका लागला . तालुक्यामध्ये 1020 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, पहिल्या ग्रेडने 812, दुसऱ्या ग्रेडने 382 तर पास ग्रेडने 25 विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.
परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेट कॅफे, संगणक प्रशिक्षण केंद्रे, महा ई सेवा केंद्र या ठिकाणी गर्दी केली.

सध्या स्मार्टफोनचे युग असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरच निकाल पाहणे पसंद केले. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही निकालाची उज्वल परंपरा राखण्यास तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांना यश आले . तर सविस्तर निकाल पुढील प्रमाणे –
श्री सरस्वती विद्यालय, कालकुंद्री ( 100), दि न्यु इंग्लिश स्कुल चंदगड ( 96 . 03), महात्मा फुले विद्यालय कार्वे ( 100), श्री राम विद्यालय कोवाड ( 98 . 55 )जनता विद्यालय, तुर्केवाडी (98 . 33), श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल माणगाव ( 98 .14), ताम्रपर्णी विद्यालय, शिवनगे ( 95 45), श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, पाटणे ( 100), मामासाहेब लाड विद्यालय, ढोलगरवाडी ( 100), श्री सिध्देश्वर हायस्कूल कुदनुर ( 92 . 30), श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर ( 96 . 61), श्री रामलिंग हायस्कूल तुडये ( 96 . 15) श्री नरसिंह हायस्कूल निट्टूर ( 100), सह्याद्री विद्यालय हेरे ( 100), जयप्रकाश विद्यालय किणी ( 100),
हलकर्णी हायस्कूल हलकर्णी ( 96 .42), धनंजय विद्यालय नागनवाडी (98.92), संजय गांधी विद्यालय नागनवाडी ( 99 .37 ) राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द ( 100), वसंत विद्यालय शिनोळी खुर्द ( 100), श्री मल्लनाथ हायस्कूल कानुर खुर्द ( 100), श्री माऊली विद्यालय, तिलारीनगर ( 100), श्री वैजनाथ विद्यालय, देवरवाडी ( 100), डुक्करवाडी विद्यालय, बागिलगे (98.18), यशवंतराव चव्हाण हायस्कूल सुरुते ( 100), साई विद्यालय इब्राहिमपूर ( 94 73 )श्री नागनाथ हायस्कूल नागरदळे ( 100), प्रो. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल मलतवाडी ( 100), श्री व्ही. के. चव्हाण पाटील कागणी ( 100), संत तुकाराम हायस्कूल सुंडी (96 .42 ) ब्रम्हलिंग विद्यालय, हजगोळी ( 95 .23), श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडे ( 100), श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्ग ( 100), चंदगड उर्दू हायस्कूल ( 100), सौ. एस. चव्हाण पाटील गल्स हायस्कूल, निट्टूर ( 100), भावेश्वरी विद्यालय, आमरोळी ( 100), वसंतदादा पाटील विद्यालय, जंगमहट्टी ( 90 .32), जी. जी. व्ही. पाटील माध्यमिक विद्यालय, म्हाळेवाडी ( 100 ), श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी-बुझवडे ( 100), श्री स्वंयभू माध्यमिक विद्यालय, उमगाव ( 100), दुंडगे माध्यमिक विद्यालय दुंडगे ( 100), न्यु हायस्कूल अलबादेवी ( 100), भावेश्वरी विद्यालय, बसर्गे ( 96 ), आदर्श हायस्कूल कामेवाडी ( 93 10 ), भरमू सुबराव पाटील हायस्कूल होसुर ( 100), एन एस पाटील विद्यालय होसूर (100) ‘तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय, तेऊरवाडी ( 100),
छत्रपती शाहु माध्यमिक विद्यालय, ढेकोळी ( 100) श्री दत्त हायस्कूल राजगोळी ( 86 .36), भाई दाजिबा देसाई पार्ले ( 100), श्री भावेश्वरी संदेश विद्यालय कानुर बुद्रुक ( 100), स्वामी विवेकानंद विद्यालय, गुडेवाडी ( 100), सातेरी विद्यालय, कोलिक ( 100), शिवराज विद्यालय, महिपाळगड ( 52 .38), आसगाव माध्यमिक विद्यालय, आसगाव ( 100), श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय, चंदगड ( 95 . 83), श्री चाळोबा माध्यमिक विद्यालय, सातवणे ( 97 .14), राजश्री शाहू महाविद्यालय, शिनोळी बुद्रुक ( 100), कलानंदीगड विद्यालय, कलिवडे (87 . 50), श्री सोमनाथ विद्यालय, हिंडगाव ( 100), आदर्श विद्यालय इसापूर ( 100). मिनाताई ठाकरे विद्यालय कालकुंद्री – ( 100) , श्री हनुमान विद्यालय करंजगाव (94 73 )
विवेक इंग्लीश मेडिअम स्कूल हलकर्णी (100)
संत स्टिफन स्कूल चंदगड (100)
कारमेल आशिष इंग्लीश मेडीअम स्कूल अडकूर (100)
क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कूल गवसे (100)
गुरुकूल इंग्लीश स्कूल (100). सर्व यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या हायस्कूलचे शिक्षक आणि व्यवस्थापकांचेही अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *