![]()
पुणे प्रतिनिधी
दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून उद्या मंगळवारी दि.13 मे दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) घेण्यात आली होती.

