जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ. मगदूम अभियांत्रिकीच्या पाच विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली असून मगदूम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच नोकरीची सुवर्णसंधी लाभत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांसह पालकातून उमटत आहेत. सिव्हिल विभागातील पाच विद्यार्थ्यांची एस. जे. कॉन्ट्रॅक्ट प्रा. लि. पुणे या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर श्री. सौरभ खानावळे यांनी दिली.तर कु. सानिया शेख,साक्षी चौगुले, सायली पाटील, शर्वरी पाटील व प्रथमेश पाटील अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
एस. जे. कॉन्ट्रॅक्ट प्रा. लि. पुणे हि नामांकित बांधकाम क्षेत्रातील कंपनी असून निवासी, व्यावसायिक इमारती, औद्योगिक प्रकल्प व विविध सिव्हिल कामे यामध्ये कार्यरत असणारी कंपनी आहे. ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील व डॉ.जे.एस. लंबे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विभाग प्रमुख व सिव्हिल विभागातील सर्व प्राध्यापकांचे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले.
