जयसिंगपूर : प्रतिनिधी

इचलकरंजी ता. हातकणंगले येथील वेध फाउंडेशन व पोलीस ऑफ इंडिया न्यूज यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्काराने उमळवाड येथील दानलिंग महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या अनिता सुधीर मालगावे यांना सन्मानित करण्यात आले.
इचलकरंजी येथे एका शानदार समारंभात माजी मंत्री प्रकाश आवाडे महापालिकाच्या अतिरिक्त आयुक्त सुष्मा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने -जाधव, महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य,मेनका माने, आरोग्य सेविका गौरी कुरुंदवाडे आदी मान्यवरांच्या हस्ते अनिता मालगावे यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अनिता मालगावे यांनी दानलिंग महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याबरोबरच त्यांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणाने प्रामाणिक प्रयत्न सुरु ठेवला आहे.तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग योजना, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना त्यांनी अनेक गरजू व गरीब लोकांच्या घराघरात पोहचवून त्याचा लाभ दिला.त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची रणरागिणी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्कार सोहळ्यास वेध फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. रजनीताई शिंदे,हरिषचन्द्र निवळेकर, फौंडेशनचे सचिव मुरलीधर शिंदे, सल्लागार डॉ. दगडू माने, आशा वाघेरे,आदीसह कार्यकर्ते व पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.