![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
प्रथितयश डॉक्टर, क्रिकेट क्लब जयसिंगपूरचे संस्थापक सदस्य सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुरज बुरसे यांना महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सामाजिक कार्य, संघटनात्मक आणि व्यवस्थापन कार्य तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संस्थेच्या प्रतिष्ठेच्या डॉक्टर सँम्युयल हॅनिमन जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२०२६ चे नॅशनल होमिओपॅथी सेमिनार नुकतेच कोल्हापूर येथील हॉटेल पॅव्हिलियन मध्ये पार पडले या सेमिनार प्रसंगी झालेल्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते आणि असोसिएशनच्या सभासदांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला, राज्यभरातील शंभर होमिओपॅथी डॉक्टरांमधून दहा डॉक्टरांची या पुरस्कारासाठी निवड केली होती, डॉक्टर सुरज बुरसे यांच्या वैद्यकीय व्यवसायासह सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
